10 Jun 2026, Wed

!! सेवाभावी व्यक्तिमत्त्वाला श्रद्धांजली ;

माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांची डॉ. कुंभारे परिवाराची घेतली सांत्वनपर भेट..

न्यू विदर्भ केसरी / फुलचंद वाघाडे..

गडचिरोली :- दिवंगत डॉ. शिवनाथजी कुंभारे यांच्या निधनाने गडचिरोली जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

या दुःखद प्रसंगी माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी आज गडचिरोली येथील त्यांच्या निवासस्थानी भेट देत कुंभारे परिवाराचे सांत्वन केले.

यावेळी मा. खा. डॉ. नेते यांनी दिवंगत डॉ. कुंभारे यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन केले व परिवाराच्या दुःखात आपणही सहभागी असल्याची भावना व्यक्त केली.

या प्रसंगी डॉ. अनंता कुंभारे यांच्यासह कुंभारे परिवार उपस्थित होते. डॉ. कुंभारे यांच्या निधनाने सामाजिक, वैद्यकीय व अध्यात्मिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना डॉ. नेते यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!