24 Jun 2026, Wed

हवामान अनुकूल तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी विभागाचे आवाहन..

आगामी खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये अल निनोचा प्रभाव कमी करण्यासाठी नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प टप्पा २.० अंतर्गत हवामान अनुकूल तंत्रज्ञानचा वापर करण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आवाहन..

न्यू विदर्भ केसरी / फुलचंद वाघाडे..

गडचिरोली, (जिमाका) दि.18:- आज जगभर हवामान बदल हा एक गंभीर प्रश्न बनला आहे. भारत हा कृषीप्रधान देश असल्याने हवामान बदल व शेतीवरील परिणाम अधिक तीव्रपणे जाणवतात. वर्ष 2026-27 हे अल निनो वर्ष असून कमी पाऊस, पाऊसात खंड अश्या परिस्थिति निर्माण होऊ शकतात या अनुषंगाने नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प अंतर्गत जिल्ह्यात हवामान अनुकूल तंत्रज्ञान प्रात्येक्षिक व जनजागृती मोहिम दिनांक २० एप्रिल २०२६ ते ३० मे २०२६ दरम्यानbघेण्यात आली आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील एकूण ७४,९९५ शेतकरी सहभागी झाले होते. या प्रकल्पाद्वारे वैयक्तिक लाभांच्या योजना सोबतच हवामान अनुकूल तंत्रज्ञानाची ज्ञानरूपी संजीवनी शेतकरी बांधवांकरिता दिलेली आहे. तसेच आभासी प्रणालीद्वारे संपूर्ण महाराष्ट्रभर डिजीटल शेतीशाळा आयोजित करण्यात आल्या. या मोहिमेदरम्यान बियाण्यांच्या उगवण क्षमतेची चाचणी, बीजप्रक्रिया व सापळा पिकांची लागवड या विषयांवर प्रात्यक्षिके आणि जनजागृती सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. या हवामान अनुकूल तंत्रज्ञान मोहीम तथा अभियान यशस्वी पार पाडण्यासाठी कृषि विभागामार्फत विकसित केलेले महाविस्तार एआय कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित शेतकरी पूरक डिजिटल व्यासपीठ आहे. या अॅप्पच्या माध्यमातून पिकावरील कीड व स्थानिक हवामान अंदाज त्यानुरसार पेरणी व कापणी व्यवस्थापन करण्याची माहिती उपलब्ध असेल. तसेच शेतकऱ्यापर्यंत नवीन कृषी तंत्रज्ञान पोहचविण्यासाठी निविष्टांचा खर्च कमी करण्यासाठी आणि लोकसहभागातून मृद व जल व्यवस्थापनाची कामे करण्यासाठी कृषी विभामार्फत दरवषी विविध मोहिमा राबविल्या जातात. खरीप 2026-27 मध्ये विविध गावात खरीप मोहिमेच्या माध्यमातून प्रचार प्रसिद्धी करण्यात येत आहे. खरीप हंगाम 2026-27 मध्ये पीक उत्पादकता वाढीसाठी जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या विविध कृषी विस्तार मोहिमां राबविण्यात येत आहे. माहे एप्रिल ते जून 2026 या तीन महिन्यांच्या कालावधीत एकूण ४७७४ मोहिमा यशस्वीरित्या पूर्ण झाल्या असून, या सर्व मोहिमांची नोंद महाकृषी ॲपवर करण्यात आली आहे एकूण ४७७४ कृषि विस्तार मोहिमा पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. तरी आगामी खरीप हंगामात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी मोहिमांमध्ये उपस्थित राहून हवामान अनुकूल तंत्रज्ञानाचा अवलंब करावा तसेच महाविस्तार एआय अॅप डाउनलोड करून शेतकरण्यांनी लाभ घ्यावे असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, गडचिरोली, श्रीमती प्रिती हिरळकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!