12 Sep 2026, Sat

गडचिरोली जिल्ह्यात पल्स पोलिओ मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद; पहिल्याच दिवशी ९२.५३% बालकांना पोलिओचा डोस!

७७,६६६ बालकांचे लसीकरण पूर्ण; सुटलेल्या बालकांसाठी आता घरोघरी विशेष मोहीम..

न्यू विदर्भ केसरी | मुख्य संपादक : फुलचंद वाघाडे..

गडचिरोली (जिमाका), दि. २८ :
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला गडचिरोली जिल्ह्यात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील ७७,६६६ बालकांना पोलिओचा डोस देण्यात आला असून ९२.५३ टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे.
मुख्य आकडेवारी :
अपेक्षित लाभार्थी : ८२,९८४ बालके
० ते ५ वर्षे वयोगट : ७६,७८९ बालके
५ वर्षांवरील : ८७७ बालके
एकूण लाभार्थी : ७७,६६६
लसीकरण प्रगती : ९२.५३%
घरोघरी विशेष मोहीम : बूथवर डोस न घेऊ शकलेल्या बालकांसाठी आता IPPI अंतर्गत घरभेटी घेऊन लसीकरण केले जाणार आहे.
शहरी भाग : सलग ५ दिवस
ग्रामीण भाग : सलग ३ दिवस
यासोबतच आरोग्य विभागाकडून ताप रुग्ण सर्वेक्षणही करण्यात येणार असून पावसाळ्यातील साथीच्या आजारांवर नियंत्रणासाठी ही मोहीम महत्त्वाची ठरणार आहे.
आवाहन : आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करून ० ते ५ वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओचा डोस देण्यासाठी पालकांनी पुढाकार घ्यावा.
दोन थेंब जिंदगीचे… पोलिओला हरवूया, देशाला जिंकवूया!”
– डॉ. प्रताप शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!