27 Jul 2026, Mon

एट्टापल्ली पेट्रोल पंप तक्रार प्रकरणाला येणार वेगळे वळण!..

२५ वर्षांपासून पेट्रोल पंपाच्या कारभाराचे ऑडिटच झाले नव्हते ; मग केवळ गेल्या तीन वर्षांतच भ्रष्टाचार झाला, असा दावा कसा केला जातो?” — गटविकास अधिकारी डॉ. आदिनाथ आंधळे.

📰 न्यू विदर्भ केसरी | मुख्य संपादक

एटापल्ली :- प्रकरणाची पार्श्वभूमी__ पंचायत समिती एटापल्लीचे ९१ व्यापारी गाळे भाडेतत्त्वावर देण्यात आले आहेत. मागील ६ ते ७ वर्षांपासून भाडे थकीत असल्याने २९ एप्रिल २०२६ रोजी थकीत भाडे वसुलीसाठी नोटिसा बजावण्यात आल्या. त्यानंतर काही गाळेधारकांनी न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र स्थगिती न मिळाल्याने प्रशासनावर आरोप करण्यात आल्याचा दावा.

प्रशासनाचे म्हणणे___ पेट्रोल पंपासाठी २००५ पासून मार्च २०२५ पर्यंतचे ऑडिटच झाले नव्हते. त्यामुळे केवळ गेल्या तीन वर्षांतच गैरव्यवहार झाला, असा निष्कर्ष काढणे चुकीचे आहे. संपूर्ण नोंदी सनदी लेखापालांकडे तपासणीसाठी पाठविण्यात आल्या असून ऑडिट प्रक्रिया सुरू आहे. ऑडिट अहवाल येण्यापूर्वी भ्रष्टाचाराचे आरोप करणे योग्य नसल्याचे प्रशासनाचे मत.

गाळे वाटपावरही प्रश्नचिन्ह___ नगरसेवक मनोहर बोरकर यांच्या नावावर एक व पत्नीच्या नावावर दोन असे एकूण तीन गाळे असल्याचा दावा. स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांना संधी न देता एकाच कुटुंबाला तीन गाळे कसे देण्यात आले, याबाबत चौकशीची मागणी. इतर गाळेधारकांपेक्षा जास्त थकीत भाडे असल्याचाही आरोप.

आता पुढे काय?___

✅ २००५ पासून आजपर्यंतच्या सर्व आर्थिक व्यवहारांचे ऑडिट पूर्ण होणार.

✅ ऑडिट अहवालानंतरच गैरव्यवहार झाला किंवा नाही, हे स्पष्ट होणार.

✅ संपूर्ण प्रकरणाकडे तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.”संपूर्ण ऑडिट अहवालानंतरच सत्य परिस्थिती जनतेसमोर येईल,” असे गटविकास अधिकारी डॉ. आदिनाथ आंधळे यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!