विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी केली पाणपोईची व्यवस्था..
धानोरा दिनांक 26 एप्रिल 2026 :- धानोरा तालुक्यातील येरकड- मुरूमगाव व इतर गावातील दौऱ्या दरम्यान भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे, भाजपा जेष्ठ नेते भारत खटी, भाजपा महिला आघाडी नेत्या सुनीता मडावी, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद आसूटकर गेले होते. यावेळी संपूर्ण दौरा आटोपून धानोरा शहरात आल्यानंतर अनेक ठिकाणी गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मिलिंद नरोटे यांनी अनेक ठिकाणी सुरू केलेला पानपोई दिसला यावेळी उपस्थित सर्वांनी थंड पाण्याचा आस्वाद घेतला व आपली तहान भागवली विषय पाणपोईचा होता व लागलेले तहानेचा होता, परंतु या ठिकाणी एकच चर्चा होती गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी धानोरा तालुक्यातील विविध गावखेड्यातून नागरिक बाजार व इतर कामासाठी धानोरा शहरात येत असतात त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना पाणी पिण्यासाठी मोठी अडचण होत होती. हॉटेलमध्ये व इतर ठिकाणी व्यवस्थित पिण्यासाठी पाणी उपलब्ध होत नव्हते. धानोरा तालुक्यातील अनेक गोरगरीब नागरिक यांना वीस रुपयाची व अथवा दहा रुपयाची पाण्याची बॉटल घेऊन पिणे सर्वांसाठी कठीण विषय आहे. त्यांच्यासाठी ही खूप मोठी बाब आहे आणि विशेष म्हणजे एखाद्या आमदाराने आपल्या मतदारसंघाच्या तीनही तालुक्यात सर्वप्रथम कर्तव्य कक्ष स्थापन करणे आणि दर आठवड्यामध्ये एक दिवस कर्तव्य कक्षात उपस्थित राहून नागरीकांच्या समस्या ऐकणे आणि जमेतोवर ” फैसला ऑन द स्पॉट “करण्याचा प्रयत्न करणे आणि ते यशस्वीरित्या चालवणे हे नक्कीच तारेवरची कसरत आहे.
परंतु डॉ. नरोटे साहेब यांनी मनातूनच सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांच्या समस्या सुटल्या पाहिजे, या 45 डिग्री तापमाणात तहानलेला नागरिकांना थंड पाण्याची सोय झाली पाहिजे हा विषय आजच्या राजकारण्यांना करणे थोडा हार्डच आहे. कारण यासाठी तो सहृदय लागतो आणि आमदार मिलिंद नरोटे यांच्यामध्ये तो सहृदय दिसून आला दर गुरुवारी धानोरा नगरीत भरणाऱ्या आठवडी बाजारात येणारे सर्वसामान्य गोरगरीब तहाणलेले नागरिक सर्वात आधी आमदार मिलिंद नरोटे यांच्या पानपोई जवळ नक्कीच येतात. आणि आपली तहान भागवताना दिसतात पण काही असो राजकारण आपल्या बाजूला पण समाजकारण करत असताना भुकेलेल्या अन्न! तहानलेल्या पाणी! आणि समस्याग्रस्त नागरिकांच्या समस्या एक सक्षम लोकप्रतिनिधी म्हणून प्रामाणिकपणे सोडवताना आमदार नरोटे साहेब दिसतात आजच्या दौऱ्यानिमित्त मिलिंद नरोटे यांच्या पाणपोईला भेट दिल्यानंतर व येथील थंड पाणी पिऊन आमचे मन नक्की शांत झाले परंतु अशा प्रकारचे गोरगरिबांचे छोटे छोटे समस्या सोडवण्याचे समाजकारण नक्कीच आपल्या गडचिरोली जिल्ह्यात झाले पाहिजे व सर्वसामान्यांना अतिशय कमी वेळामध्ये कर्तव्य कक्षातून न्याय देणारे आमदार म्हणून डॉ. मिलिंद नरोटे प्रचलित झालेले आहेत. याबद्दल त्यांचे अभिनंदन करावे तितकेच कमी आहे. डॉ. मिलिंद नरोटे आपण अशा प्रकारेच काम सुरू ठेवावे अशी आमच्या पदाधिकारी वर्गांची सर्वांची इच्छा आहे. गडचिरोली विधानसभा मतदारसंघाच्या आशीर्वादाने आपण पुढच्या मंत्रिमंडळ विस्तारात गडचिरोली जिल्ह्याचे नेतृत्व स्वीकारावे व पुन्हा जोमाने गडचिरोली जिल्ह्याला न्याय द्यावे हीच आपल्याकडून इच्छा आहे.. धन्यवाद.

