10 Jun 2026, Wed

मा. खा. डॉ. अशोक नेते यांच्या हस्ते ना. नितीनजी गडकरी यांना दिला वाढदिवसाच्या शुभेच्छा..

देशाच्या विकासाचे महामेरू केंद्रीय मंत्री मा.श्री.नितीनजी गडकरी यांना माजी खासदार अशोकजी नेते यांच्याकडून नागपूर येथे वाढदिवसाच्या शुभेच्छा !_

न्यू विदर्भ केसरी प्रतिनिधी..

नागपूर :- दि.२७ मे २०२६ रोजी नागपूर येथील देशाच्या पायाभूत विकासाचे शिल्पकार आणि ‘हायवे मॅन’ म्हणून ओळखले जाणारे भारत सरकारचे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री मा. श्री. नितीनजी गडकरी साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी नागपूर येथे आज त्यांची सदिच्छा भेट घेतली. या प्रसंगी डॉ.अशोकजी नेते यांनी गडकरी साहेबांना पुष्पगुच्छ प्रदान करून वाढदिवसाच्या मनःपूर्वक व हार्दिक शुभेच्छा दिल्या. मा. नितीनजी गडकरी यांच्या नेतृत्वात देशासह महाराष्ट्रात, विशेषतः विदर्भातील दुर्गम भागांमध्ये रस्ते विकासाची अभूतपूर्व कामे झाली आहेत. आधुनिक महामार्ग, उड्डाणपूल आणि संपर्क व्यवस्था मजबूत करण्यामध्ये त्यांचे योगदान उल्लेखनीय ठरले आहे. यावेळी डॉ. अशोकजी नेते यांनी गडकरी साहेबांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व निरंतर जनसेवेची ऊर्जा लाभो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!